हा महाराष्ट्र येड्या गबाळ्यांसमोर झुकणार नाही, संजय राऊतांनी ठणकावलं
शिवसेना आणि महाराष्ट्र हा अशा येड्यागबाळ्यांपुढे झुकणारा नाही. महाराष्ट्राचा बाणा आहे. महाराष्ट्राला सुपर स्प्रेडर म्हणालात. महाराष्ट्राच्या नद्यांमध्ये समुद्रामध्ये प्रेतं पडली नव्हती, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपला फटकारलं.
मला जे काल बोलायचं होतं ते मी बोललो. यापुढे जे बोलायचंय ते महाराष्ट्राच्या राजधानीत, मुंबई शहरात बोलेन. एक सांगतो, कितीही प्रयत्न करा.. खोटे पुरावे उभे करा, लोकांना धमकावा, सरकार पाडण्याच्या धमक्या द्या. पण शिवसेना आणि महाराष्ट्र हा अशा येड्यागबाळ्यांपुढे झुकणारा नाही. महाराष्ट्राचा बाणा आहे. महाराष्ट्राला सुपर स्प्रेडर म्हणालात. महाराष्ट्राच्या नद्यांमध्ये समुद्रामध्ये प्रेतं पडली नव्हती, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपला फटकारलं.
Latest Videos