एकनाथ शिंदेंच्या 'या' 4 मंत्र्यांना डच्चू मिळणार? संदिपान भूमरे म्हणतात...

एकनाथ शिंदेंच्या ‘या’ 4 मंत्र्यांना डच्चू मिळणार? संदिपान भूमरे म्हणतात…

| Updated on: Jun 12, 2023 | 4:58 PM

शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच पार पडणार आहे.यावेळी मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळावं यासाठी प्रत्येक आमदाराची इच्छा आहे. अशातच आता अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या चार ते पाच मंत्र्यांना डच्चू द्यावा, असे सांगितल्याचे समजते. यावरून मंत्री संदीपान भुमरे ही अफवा असल्याचं म्हणत आहेत.

औरंगाबद : शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच पार पडणार आहे.यावेळी मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळावं यासाठी प्रत्येक आमदाराची इच्छा आहे. अशातच आता अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या चार ते पाच मंत्र्यांना डच्चू द्यावा, असे सांगितल्याचे समजते. यावरून आता राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे. कोणाला मंत्री ठेवायचं हा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. तर मंत्री संदीपान भुमरे ही अफवा असल्याचं म्हणत आहेत. “मंत्रिमंडळातून डच्चू देणार या विरोधकांनी पेरलेल्या बातम्या आहेत.मंत्रिमंडळ विस्तार जवळ आला की आशा बातम्या येत असतात”, असं भुमरे म्हणाले.

Published on: Jun 12, 2023 04:58 PM