मंत्री होताच संदीपान भुमरेंकडे एक-दोन नाहीतर इतक्या वाईन शॉप्सचं लायसन्स, थेट मोदींकडे कारवाईची मागणी?
संदीपान भुमरे यांनी पत्नी, सून आणि नातेवाईकांच्या नावाने सहा दारूच्या दुकानांचं लायसन्स मिळवलं. त्यामुळे मंत्रीपदाचा दुरूपयोग केल्यानं संदीपान भुमरे यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी ठाकरे यांच्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे. काय आहे नेमकं प्रकरण? कोणी केली संदीपान भुमरे यांच्यावर कारवाईची मागणी?
२०१९ पासून मंत्रीपदी असताना संदीपान भुमरे यांनी पत्नी, सून आणि नातेवाईकांच्या नावाने सहा दारूच्या दुकानांचं लायसन्स मिळवलं. त्यामुळे मंत्रीपदाचा दुरूपयोग केल्यानं संदीपान भुमरे यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी ठाकरे यांच्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरचे उपजिल्हा प्रमुख दत्ता गोर्डेंनी माहितीच्या अधिकारात भुमरेंच्या दारूच्या दुकानांची माहिती मिळवली. संदीपान भुमरे यांची सून वर्षा विलास भुमरे यांच्या नावे ३ दारूच्या दुकानांचं विरांश वाईन्स या नावे लायसन्स आहे. दोन लायन्स हे संदीपान भुमरे यांच्या पत्नी पुष्पा भुमरे यांच्या नावाने आहेत. तर मिसेस काकडे आणि रेवाडकर यांच्या नावाने एक सागर वाईन्स या नावाने लायन्सस आहे. २०१९ च्या पूर्वी संदीपान भुमरे मंत्री नसताना त्यांच्याकडे एकही लायसन्स नव्हतं. मात्र मंत्री होताच एवढी लायसन्स मिळवल्याचे ठाकरे गटाच्या नेत्याचं म्हणणं आहे. त्यामुळे या वाईन शॉपचे लायसन्स रद्द करण्याची मागणी त्यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे.