Sangali : अहिल्यादेवी स्मारकाचा लोकार्पण सोहळा, भाजप-राष्ट्रवादीत जुंपली
विजयनगर भागातील प्रभाग क्र. 8 मधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे 2 एप्रिलला उद्घाटन होणार आहे. राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार यांच्याहस्ते उद्घाटन होणार होते. मात्र, त्याआधीच म्हणजे 27 मार्चला स्मारकाचं लोकार्पण करण्याचा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.
सांगली : विजयनगर भागातील प्रभाग क्र. 8 मधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे 2 एप्रिलला उद्घाटन होणार आहे. राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार (MP Sharad Pawar) यांच्याहस्ते उद्घाटन होणार होते. मात्र, त्याआधीच म्हणजे 27 मार्चला स्मारकाचं लोकार्पण करण्याचा इशारा आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी दिला आहे. त्यामुळे कोणताही गोंधळ किंवा कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारी म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी (NCP) आणि भाजपमध्ये जुंपल्याचं दिसून येतंय.
Published on: Mar 25, 2022 01:15 PM
Latest Videos