ना अजित पवार, ना सुप्रिया सुळे ‘ही’ व्यक्ती महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी -अमोल कोल्हे

| Updated on: Apr 27, 2023 | 9:41 AM

Amol Kolhe : 'ही' व्यक्ती महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी; अमोल कोल्हे यांनी उघडपणे मनातील भावना सांगितल्या, पाहा व्हीडिओ...

सांगली : अजित पवार बंड करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होतेय. मुख्यमंत्रिपद आणि अजित पवार हे समीकरण सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. मुख्यमंत्रिपदाबाबती महत्वकांक्षा अजित पवार यांनीही बोलून दाखवली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचंही नाव मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत आहे. अशातच राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या मनातील भावना सांगितल्या आहेत. “माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांच्यासारख्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत नेत्याची राज्याला मुख्यमंत्री म्हणून गरज आहे. ते आदर्श मुख्यमंत्री ठरतील, अशी भावना खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे. तसंच जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतिक पाटील यांना लोकसभेत पाठवा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दोन दिवसांपूर्वी सांगली दौऱ्यावर खासदार अमोल कोल्हे आले होते, त्यावेळी एका कार्यक्रमात अमोल कोल्हे यांनी या भावना व्यक्त केल्या आहेत.

Published on: Apr 27, 2023 09:41 AM
सत्तेत असणाऱ्या भाजप-शिंदे गटात रेल्वे स्थानकाच्या नावावरून वाद; काय आहे प्रकरण?
संजय राऊत जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेट घेणार; काय कारण?