Pune : भारती विद्यापीठ परिसरात झाडांची कत्तल? २०० फांद्या कापण्याची परवानगी पण...संघर्ष सेनेचा आरोप काय?

Pune : भारती विद्यापीठ परिसरात झाडांची कत्तल? २०० फांद्या कापण्याची परवानगी पण…संघर्ष सेनेचा आरोप काय?

| Updated on: Nov 08, 2023 | 12:54 PM

पुण्याच्या भारती विद्यापीठ परिसरातील झाडांची कत्तल केल्याचा आरोप करण्यात येतोय. महानगरपालिकेने 200 झाडांच्या फांद्या कापण्याची परवानगी दिली आहे. ही परवानगी दिलेली असताना 500 हून अधिक झाडांची कत्तल करण्यात आली असल्याचा आरोप संघर्ष सेनेकडून करण्यात आला आहे.

पुणे, ८ नोव्हेंबर २०२३ | पुण्याच्या भारती विद्यापीठ परिसरामधील, महानगरपालिकेने 200 झाडांच्या फांद्या कापण्याची परवानगी दिली आहे. ही परवानगी दिलेली असताना 500 हून अधिक झाडांची कत्तल करण्यात आली असल्याचा आरोप संघर्ष सेनेकडून करण्यात आला आहे. संघर्षसेनेनी त्यानंतर पालिका अधिकाऱ्यांना ही बाब लक्षात आणून दिली. यानंतर कायदेशीर कारवाई करण्याबाबत महानगरपालिकेला निवेदन दिलं आहे. लवकरात लवकर कायदेशीर कारवाई झाली नाही तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघर्षसेनेकडून देण्यात आलाय. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे  काय कारवाई होणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Published on: Nov 08, 2023 12:54 PM