Sangli | सांगलीतील भुवनेश्वरवाडीच्या पूरग्रस्तांनी मांडल्या व्यथा
पावसानं जीव कावलेला, त्यात दोन दिवस महापूर काय आला… घर, शिवारात होत्याच नव्हतं करुन गेला. अशा कृष्णाकाठच्या गावागावातील महापूराच्या व्यथा… तर आयुष्याच्या शेवटच्या पानावर, खळाळणाऱ्या डोळ्यातून वेदनांचा हिशोब मांडणाऱ्या आक्काताई रावळ....
पावसानं जीव कावलेला, त्यात दोन दिवस महापूर काय आला… घर, शिवारात होत्याच नव्हतं करुन गेला. अशा कृष्णाकाठच्या गावागावातील महापूराच्या व्यथा… तर आयुष्याच्या शेवटच्या पानावर, खळाळणाऱ्या डोळ्यातून वेदनांचा हिशोब मांडणाऱ्या आक्काताई रावळ. त्यांच्या घरातून चार होती नव्हती तेवढी भांडीही महापूराने वाहून गेलीत.पलुस तालुक्यातील भुवनेश्वरवाडी या येथील प्रत्येक घराघराची अशी व्यथा दिसते.
भुवनेश्वरीचे प्रसिद्ध तिर्थस्थान, औदुंबरच्या दत्तगुरूंचे मुळस्थान असणाऱ्या, 65 घरे आणि सुमारे साडेचारशे लोकवस्ती असणाऱ्या या गावातील लोकांना बोटीतून बाहेर काढण्यात आले. आता पूर ओसरतोय, अजून गावात यायला धड वाटही नाही. बुरूंगवाडी धनगांव मार्गाने चिखलातून कशीबशी वाट काढत आलेल्या काही गावकऱ्यांना घराघरातून गाळ उपसणे मुश्कील झालंय.
Latest Videos