‘मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फॅन’, हा नेता शिवसेनेच्या वाटेवर?
VIDEO | हा नेता लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार? जाहीरपणे सांगितलं, 'मी एकनाथ शिंदे यांचा...'
सांगली : राज्यातील शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिवसेनेचे दोन गट पडल्याचे समोर आले. यानंतर शिवसेना नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे गेल्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून शिंदेंवर जोरदार आगपाखड केली जात असल्याचे दिसतेय. अशातच शिंदेंच्या शिवसेनेत अनेक नेते पक्ष प्रवेश करत असताना सांगली जिल्ह्याच्या उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी मुख्यमंत्री एकनाथ यांचे जाहीर कार्यक्रमात कौतुक करत आपण “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फॅन” असल्याचे जाहीर वक्तव्य केले आहे, तसेच कामाच्या बाबतीत एकनाथ शिंदे यांचा हात कोणी धरू शकत नाही, असे देखील स्पष्ट करत आता एकनिष्ठ राहण्याचे दिवस गेले, असे जाहीर वक्तव्य केल्याने सांगली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता संजय विभुते हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात सुरू झाली आहे.