Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : Sangli Election Result 2022 | आबांच्या पोरानं 'पंचायत' गाजवली, कवटेमहांकाळावर पाटलांचा झेंडा |

VIDEO : Sangli Election Result 2022 | आबांच्या पोरानं ‘पंचायत’ गाजवली, कवटेमहांकाळावर पाटलांचा झेंडा |

| Updated on: Jan 19, 2022 | 1:51 PM

राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील (RR Patil) यांचे सुपुत्र रोहित पाटील(Rohit Patil) यांनी कवळेमहाकांळ निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर प्रचारादरम्यान विरोधकांना उत्तर देताना केलेलं विधान तंतोतंत खरं ठरलंय. विरोधकांनी टीका करताना रोहित पाटील यांच्यावर निशाणा साधताना ‘त्याला बाप आठवेल’ असा टोला लगावला होता.

राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील (RR Patil) यांचे सुपुत्र रोहित पाटील(Rohit Patil) यांनी कवळेमहाकांळ निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर प्रचारादरम्यान विरोधकांना उत्तर देताना केलेलं विधान तंतोतंत खरं ठरलंय. विरोधकांनी टीका करताना रोहित पाटील यांच्यावर निशाणा साधताना ‘त्याला बाप आठवेल’ असा टोला लगावला होता. दरम्यान, या विरोधकांच्या वक्तव्यांना उत्तर देताना विरोधकांना निकालानंतर माझा बाप आठवल्याशिवाय राहणार नाही, असं विधान केलं होतं. निवडणूक निकालानंतर अगदी तसंच झालंय. रोहित पाटील यांनी कवठेमहाकांळ नगरपंचायीतवर विजयी झेंडा फडकवला आहे.