Sambhaji Bhide : भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत
Sambhaji Bhide Dog Bite In Sangli : संभाजी भिडे गुरुजी यांना सांगलीमध्ये एका कुत्र्याने चावा घेतला होता. त्यानंतर या कुत्र्याला शोधण्यासाठी पालिका प्रशासन दिवस रात्र एक करत आहे.
संभाजी भिडे यांना चावणाऱ्या कुत्र्याला शोधण्यासाठी सांगलीची पालिका यंत्रणा अहोरात्र मेहनत घेत आहे. इतर वेळी सुस्त असणारं सांगली पालिकेचं पथक गेल्या 36 तासांपासून फील्डवर आहे. इतर 10 ते 12 कुत्रे सापडले मात्र भिडे गुरुजींना चवणारणं कुत्र मात्र अद्यापही सापडलेल नाही.
दोन दिवसांपूर्वी संभाजी भिडे गुरुजी यांना सांगलीमध्ये एका कुत्र्याने चावा घेतला होता. त्यानंतर पालिका प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. कालपासून शहरातील भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी पालिकेच पथक व्हॅन घेऊन फिरत आहे. या मोहिमेत शहरातली 10 ते 12 कुत्री पथकाने पकडली आहेत. मात्र भिडे गुरुजींचा चावा घेणारं कुत्रं मात्र अद्यापही सापडलेलं नाही. त्या कुत्र्याला शोधण्यासाठी यंत्रणा अहोरात्र मेहनत घेत आहे.

चुन चुन के नंतर मारा,आधी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या; संजय राऊत बरसले

अखेर सत्य उघड! पहलगाम हल्ल्याचा कट पाकिस्तानचाच? एनआयएचा अहवाल तयार

हंडाभर पाण्यासाठी वणवण पायपीट; इगटपुरीत भीषण पाणी टंचाई

एजाज खानच्या 'हाऊस अरेस्ट' शो वर बंदी घालण्याची चित्रा वाघ यांची मागणी
