महापुराच्या छायेत असलेल्या सांगलीकरांना दिलासा; कृष्णा नदीची पाणी पातळी घटली अन्…
महापुराच्या भितीखाली असणाऱ्या सांगलीकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे. गेली दोन दिवस मुसळधार पावसामुळे 41 फूट असणारी सांगलीच्या कृष्णा नदीची पाणी पातळी आज 2 फुटांनी खाली आली आहे. रात्री कृष्णा नदीची 39 फुटावर स्थिर असणारी पाणी पातळी आज सकाळी 39 फूट इतकी झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे कृष्णा नदीचे पाणी अतिशय संथगतीने वाहतंय. तर सांगली जिल्ह्यातील […]
महापुराच्या भितीखाली असणाऱ्या सांगलीकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे. गेली दोन दिवस मुसळधार पावसामुळे 41 फूट असणारी सांगलीच्या कृष्णा नदीची पाणी पातळी आज 2 फुटांनी खाली आली आहे. रात्री कृष्णा नदीची 39 फुटावर स्थिर असणारी पाणी पातळी आज सकाळी 39 फूट इतकी झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे कृष्णा नदीचे पाणी अतिशय संथगतीने वाहतंय. तर सांगली जिल्ह्यातील शाळा आजपासून सुरू होणार असून सांगली जिल्ह्यातील 9 शाळा फक्त बंद राहणार आहे. कारण या 9 शाळांपैकी 8 ठिकाणी निवारा केंद्र तर एक शाळेत पाणी भरलं असल्याची माहिती शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी दिली आहे. मात्र आजपासून शाळा सुरू झाल्याने पालकांची चिंता वाढली आहे. कृष्णा नदीची इशारा पाणी पातळी 40 असून धोका पातळी 45 फूट आहे. पावसाने दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर आज पुन्हा संततधार पावसाने सकाळपासून सुरूवात केली आहे.