… तेव्हा सुषमा अंधारे यांना पेढे पाठवणार, शहाजीबापू पाटील असं का म्हणाले?
'सुशील कुमार शिंदे यांना भाजपने ऑफर दिली का नाही हे माहीत नाही. माझ्या मते दिली नसावी. कारण ही ऑफर परिस्थितीनुसार सुशील कुमार शिंदे यांनी स्वीकारली असती',सुशील कुमार पाटील आणि प्रणिती शिंदे यांना भाजपची ऑफर मिळाल्याच्या चर्चांवर शहाजीबापू पाटील यांनी थेट प्रतिक्रिया दिली
सातारा, १७ जानेवारी २०२४ : सुशील कुमार शिंदे यांना भाजपने ऑफर दिली का नाही हे माहीत नाही. माझ्या मते दिली नसावी. कारण ही ऑफर परिस्थितीनुसार सुशील कुमार शिंदे यांनी स्वीकारली असती, असे शहाजीबापू पाटील यांनी सुशील कुमार पाटील आणि प्रणिती शिंदे यांना भाजपची ऑफर मिळाल्याच्या चर्चांवर थेट प्रतिक्रिया दिली. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओवरुन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका होत आहे. यावर बोलताना शहाजीबापू म्हणाले, सुषमा अंधारे ना एवढेच सांगू इच्छितो आम्ही गुवाहाटीला गेल्यामुळेच या दुष्काळी भागातील सोळा तालुक्याचा प्रश्न अठरा योजनेला मंजुरी देऊन मार्गी लागला जर आम्ही गुवाहाटीला गेलो नसतो तर यातील एकही काम मार्गी लागले नसते आणि लवकरच सांगोल्याची स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे पाणी योजना इथे पंधरा दिवसात मार्गी लागत आहे. त्यामुळे टीव्हीवरूनच मी तुम्हाला गोड पेढे पाठवीन, असे म्हणत त्यांनी टोलाही लगावला.