अजब कारभार… दिवंगत शिवसैनिकावरच गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
'दिवंगत शोभा मगर यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. हे अत्यंत अशोभनीय कृत्य आहे. शोभा मगर या शिंदे गटाच्या पदाधिकारी होत्या आणि 10-12 महिन्यापूर्वीच त्यांचे निधन झाले आहे. मात्र तरी देखील पोलिसांनी त्यांचे नाव गुन्ह्यात टाकणे हास्यास्पद आहे.', संजय बडगुजर नेमकं काय म्हणाले.
शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने काल नाशिक येथील घोटी टोल नाका येथे आंदोलन करण्यात आलं. मात्र या आंदोलनानंतर पोलिसांनी काही जणांवर गुन्हे दाखल केले. गुन्हे दाखल कऱण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये शिवसेनेच्या एका दिवंगत महिला पदाधिकाऱ्याचं नाव असून त्या महिला पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सगळ्या प्रकारावर ठाकरे गट नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘पोलिसांची जी कृती आहे ती अतंत्य चुकीची आहे. दिवंगत शोभा मगर यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. हे अत्यंत अशोभनीय कृत्य आहे. शोभा मगर या शिंदे गटाच्या पदाधिकारी होत्या आणि 10-12 महिन्यापूर्वीच त्यांचे निधन झाले आहे. मात्र तरी देखील पोलिसांनी त्यांचे नाव गुन्ह्यात टाकणे हास्यास्पद आहे.’, असं सुधाकर बडगुजर म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी आदेश कधी जारी केला आम्हाला माहिती नाही. जमावबंदी आदेशाचे नोटिफिकेशन कुठे आहे? पोलिसांकडून चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केले आहेत. तर 31 तारखेपर्यंत रस्ते दुरुस्त न झाल्यास जन आंदोलन करणार अन्यथा 31 तारखेनंतर शिवसेना काय आहे हे आम्ही दाखवून देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.