शरद पवार देशाचे पंतप्रधान व्हावेत, अशी सगळ्यांचीच इच्छा पण…; शिवसेनेच्या आमदाराचं वक्तव्य
Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे आणि पंतप्रधानपदावर शिवसेनेच्या आमदाराने भाष्य केलंय. नेमकं वक्तव्य काय आहे? पाहा...
मुंबई : “ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये पंतप्रधान पदावरून आयुष्यभर वाद होत राहतील. अशाच पद्धतीचं वातावरण सभांमध्येही पाहायला मिळेल. या दोन पक्षामधील अंतर्गत वाद अशाच पद्धतीने लोकांसमोर येत राहील. शरद पवार यांनी पंतप्रधान व्हावं, अशी सगळ्यांची इच्छा आहे. पण आता त्यांचं वय राहिलेलं नाही”, असं शिवेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे. संजय गायकवाड यांनी सत्तासंघर्षावरील सुनावणीवरही प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयावर आमचा विश्वास आहे. जो काही निर्णय होईल तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल. भीतीचं वातावरण ठाकरेंच्या गटात आहे. तसंच भीतीचं वातावरण आमच्या गटातही आहे. पण जे होईल ते मान्य करावे लागेल आणि पुढे जावे लागेल, असंही संजय गायकवाड म्हणाले आहेत.