Video : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांना क्लिनचीट, राजकीय पुनर्वसन होणार?

Video : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांना क्लिनचीट, राजकीय पुनर्वसन होणार?

| Updated on: Jun 12, 2022 | 5:51 PM

पूजा चव्हाण (pooja chavan) आत्महत्या प्रकरणात 14 महिन्यानंतर क्लिनचीट मिळाल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांचं पुन्हा मंत्रिमंडळात पुनरागमन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोहरादेवीच्या महंतांनी आज राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याची मागणी केली. राठोड यांना पूजा चव्हाण प्रकरणात क्लिनचीट मिळाली आहे. त्यामुळे […]

पूजा चव्हाण (pooja chavan) आत्महत्या प्रकरणात 14 महिन्यानंतर क्लिनचीट मिळाल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांचं पुन्हा मंत्रिमंडळात पुनरागमन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोहरादेवीच्या महंतांनी आज राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याची मागणी केली. राठोड यांना पूजा चव्हाण प्रकरणात क्लिनचीट मिळाली आहे. त्यामुळे राठोड यांचं पुनर्वसन करा. राज्याच्या मंत्रिमंडळात बंजारा समाजाचा प्रतिनिधी नाही. त्यामुळे समाजाचा प्रतिनिधी घेऊन समाजाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी हातभार लावावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिंदे यांची भेट घेतल्यानंतर पोहरादेवींचे महंत आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांकडेही ते हीच मागणी करणार आहेत. त्यामुळे आता राठोड यांना मुख्यमंत्री न्याय देतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Published on: Jun 12, 2022 05:51 PM