Sanjay Rathod | मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलीन होऊ नये म्हणून राजीनामा दिला : संजय राठोड
'मी एका प्रकरणादरम्यान राजीनामा दिला आहे, आता परत मला मंत्रीपद द्यायचं की नाही हा संपूर्ण निर्णय माननीय श्री मुख्यमंत्री साहेबांचा आहे मात्र मी माझ्या समाजासाठी काम करत राहणार' असं माजी मंत्री संजय राठोड म्हणाले
‘मी एका प्रकरणादरम्यान राजीनामा दिला आहे, आता परत मला मंत्रीपद द्यायचं की नाही हा संपूर्ण निर्णय माननीय श्री मुख्यमंत्री साहेबांचा आहे मात्र मी माझ्या समाजासाठी काम करत राहणार’ असं माजी मंत्री संजय राठोड म्हणाले. मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलीन होऊ नये म्हणून मी स्वतःहून राजीनामा दिला, अशी माहिती संजय राठोड यांनी दिली. त्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, हीच आपली मागणी होती, परंतु विरोधीपक्षांनी अधिवेशन चालू न देण्याची भूमिका घेतल्यामुळे पदावरुन पायउतार झाल्याचं संजय राठोड यांनी त्यावेळी सांगितलं होतं. मी बाजूला राहून चौकशी व्हावी, सत्य बाहेर यावं, ही माझी भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांना हे सांगून मी राजीनामा दिला. अशी पहिली प्रतिक्रिया संजय राठोड यांनी राजीनाम्यानंतर दिली होती.
Latest Videos