महाविकास आघाडीत 'वंचित'चा नेमका रोल काय? जागांवर दिल्लीत बैठक, फॉर्म्युला ठरणार?

महाविकास आघाडीत ‘वंचित’चा नेमका रोल काय? जागांवर दिल्लीत बैठक, फॉर्म्युला ठरणार?

| Updated on: Jan 09, 2024 | 11:53 AM

प्रकाश आंबेडकर यांना अकोल्यातील जागा देणार असल्याचे म्हणत मविआचं एकमत झाल्याचे संजय राऊत यांनी म्हटलंय. यावरून प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊत यांना चांगलंच ठणकावलंय. आपण कुठूनही लढू शकतो. आधी तुमचं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जागा वाटपांबाबत काय ठरलं? हे सांगावं, असं प्रकाश आंबेडकर यांनी थेट म्हटलंय

मुंबई, ९ जानेवारी २०२४ : आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा सन्मान होणार, असं संजय राऊत यांनी वारंवार म्हटलंय. आता तर प्रकाश आंबेडकर यांनी अकोला मतदारसंघातून लढावं असंच संजय राऊत यांनी म्हटलंय. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांना अकोल्यातील जागा देणार असल्याचे म्हणत मविआचं एकमत झाल्याचे संजय राऊत यांनी म्हटलंय. यावरून प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊत यांना चांगलंच ठणकावलंय. आपण कुठूनही लढू शकतो. आधी तुमचं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जागा वाटपांबाबत काय ठरलं? हे सांगावं, असं प्रकाश आंबेडकर यांनी थेट म्हटलंय. यासह ते असेही म्हणाले, मी मुंबईतूनही लढू शकतो तुम्हा आकोल्यातून लढायचं तर लढा, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी चांगलंच ठणकावून सांगितलंय. प्रकाश आंबेडकर यांचा सन्मान ठेवला जाईल असं राऊत म्हणताय, पण वंचितच्या १२ जागांच्या मागणीवर ते काही थेट भाष्य करत नाहीये. त्यामुळे तुमचं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जागा वाटपांबाबत काय ठरलं? असा थेट सवाल प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे गटाला केलाय.

Published on: Jan 09, 2024 11:53 AM