मनसेच्या सभेसाठी निमंत्रण अन् रिकामी खूर्ची... राज ठाकरेंवर राऊत भडकले; म्हणाले, '...आम्हाला भाषा शिकवू नये. '

मनसेच्या सभेसाठी निमंत्रण अन् रिकामी खूर्ची… राज ठाकरेंवर राऊत भडकले; म्हणाले, ‘…आम्हाला भाषा शिकवू नये. ‘

| Updated on: Nov 13, 2024 | 4:17 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विक्रोळीमधील सभेला ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. इतकंच नाहीतर या मनसेच्या सभेत संजय राऊत यांच्यासाठी एक खूर्ची रिकामी ठेवण्यात येणार असल्याची माहिती मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी दिली. यावर राऊतांनीच प्रतिक्रिया दिलीये

राज ठाकरे यांची विक्रोळीमध्ये सभा होत आहे. या सभेला मनसेकडून संजय राऊत यांना निमंत्रण देण्यात आले आहे. सभेत संजय राऊत यांच्यासाठी एक खुर्ची रिकामी ठेवण्यात येणार आहे. संजय राऊत यांच्यासाठी एक खुर्ची रिकामी ठेवण्यात येणार असल्याची माहिती मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी दिली आहे.  मनोज चव्हाण यांनी संजय राऊत यांच्या मेंदूला गंज लागलाय ते काहीही बोलतात त्यामुळे राजकीय नेत्याने कसे बोलावे हे ऐकण्यासाठी यावं, असं खोचकपणे वक्तव्य केलं होतं.  राजकीय विचार कसे असावेत आणि विचारांची देवाण घेवाण कशी असावी या यासाठी या सभेला या, असं म्हणत राज ठाकरेंच्या विक्रोळीमध्ये होणाऱ्या सभेला मनसेकडून संजय राऊत यांना निमंत्रण देण्यात आलंय. दरम्यान, संजय राऊत यांना मनसेकडून देण्यात आलेल्या विक्रोळीतील राज ठाकरेंच्या सभेच्या निमंत्रणावर भाष्य केले आहे. माध्यम प्रतिनिधींनी यासंदर्भात सवाल केला असता संजय राऊत मनसे अन् राज ठाकरे भडकल्याचे पाहायला मिळाले. “राज ठाकरे यांनी आधी स्वत:ची भाषणं स्वतः ऐकावी आणि पहावी. मग कळेल त्यांना. त्यांनी आम्हाला भाषा शिकवू नये. खासकरुन मराठी भाषा शिकवू नये. आम्ही ज्या हेड मास्टरकडे शिकलो, त्यानंतर मराठीत असा कुणी हेड मास्टर झाला नाही, त्याचं नाव बाळासाहेब ठाकरे” असं सडेतोड उत्तर संजय राऊत यांनी दिलं.

Published on: Nov 13, 2024 12:06 PM