अन् थोडक्यात चुकामूक झाली; निवृत्ती नाथांच्या दर्शनावेळी संजय राऊत-दादा भूसे आमने-सामने, मात्र….
निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुका चांदीच्या पालखी ठेवून सजवलेल्या रथाच्या माध्यमातून प्रस्थान सोहळा सुरू होणार होती. त्याचपुर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्र्यंबकेश्वर येथे जात पालखीचे दर्शन घेतले. याचदरम्यान तेथे पालकमंत्री दादा भुसे यांचे आगमन झाले.
नाशिक : संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान आज पंढरपूरच्या दिशेने झालं. दुपारी निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुका चांदीच्या पालखी ठेवून सजवलेल्या रथाच्या माध्यमातून प्रस्थान सोहळा सुरू होणार होती. त्याचपुर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्र्यंबकेश्वर येथे जात पालखीचे दर्शन घेतले. याचदरम्यान तेथे पालकमंत्री दादा भुसे यांचे आगमन झाले. यावेळी भुसे यांनी निवृत्तीनाथ पालखीच्या दर्शन घेतले. दरम्यान दोन्ही कडच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी झाली. दोन्ही नेते एकमेकांकडे कानाडोळा करत शेजारून निघून गेले. यावरून सध्या चर्चा रंगली आहे. तर यावरून राऊत यांना विचारलं असतान त्यांनी मी नाही बघीतलं असं म्हटलेलं आहे. तर घोषणांवरून विचारलं असता माझ्या मनात फक्त पांढूरंगाचा गजर ऐकत होतो. बाकी मी काही ऐकलं नाही, असेही ते म्हणाले. तर यादरम्यान दोन्हा नेते बाजूने गेल्यानंतर काही होतं का वाद होणार ही संभावणा होती. ती मात्र टळली.