Devendra Fadnavis | बेळगावात मराठी माणसाचा पराभव नाही : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis | बेळगावात मराठी माणसाचा पराभव नाही : देवेंद्र फडणवीस

| Updated on: Sep 08, 2021 | 6:39 PM

बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 35 वर्षांच्या वर्चस्वाला सुरुंग लागला. पहिल्यांदाच पक्षपातळीवर झालेल्या या निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलं.

मुंबई  : बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 35 वर्षांच्या वर्चस्वाला सुरुंग लागला. पहिल्यांदाच पक्षपातळीवर झालेल्या या निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलं. त्यामुळे आता बेळगाव महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागलं. या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला “महाराष्ट्र भाजपाने फालतू गप्पा मारू नयेत. बेळगाव महाराष्ट्राचेच आहे की नाही एवढेच त्यांनी आज स्पष्ट करावे. तो कुणाचा काय अहंकार हे नंतर बघू. मराठी एकजुटीचा बेळगावात विजय झालाच पाहिजे असे बोलणे हा अहंकार की मराठी अस्मिता हे 11 कोटी मराठी जनतेलाच ठरवू द्या, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. तर त्याला प्रत्यूत्तर म्हणून बेळगावात मराठी माणसाचा पराभव झाला नाही, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला.