“बालासोर रेल्वे अपघाताचा मोदी सरकार इव्हेंट करतंय”, संजय राऊत यांचा घणाघात
ओडिशाच्या बालासोर येथील दुर्घटनेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ओडिशाच्या बालासोर येथील दुर्घटना देशातील इतिहासातील सर्वात भयंकर अपघात होता.अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अपघातस्थळी गेले. तिथे मोदी मोदींच्या घोषणा झाल्या. हे सरकार अपघाताचंही इव्हेंट करत आहे.
मुंबई: ओडिशाच्या बालासोर येथील दुर्घटनेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ओडिशाच्या बालासोर येथील दुर्घटना देशातील इतिहासातील सर्वात भयंकर अपघात होता.अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अपघातस्थळी गेले. तिथे मोदी मोदींच्या घोषणा झाल्या. हे सरकार अपघाताचंही इव्हेंट करत आहे. या देशात असं कधी झालं नाही. जिथे सीबीआय चौकशी करायची तिथं करत नाही. आम्ही भाजपला पुरावे दिले. पण चौकशी नाही. मुळात सीबीआय चौकशी हा वेळकाढूपणा आहे. पंतप्रधान राजीनामा देणार आहात? जबाबदारी कोण घेणार?अपघाताचं इव्हेंट करणारं हे सरकार आहे. स्मशानातही तुम्ही इव्हेंट करत आहात?, असा सवाल संतप्त सवाल संजय राऊत यांनी केला.
Published on: Jun 05, 2023 11:52 AM