Sanjay Raut Live | मोकळ्या माणसाचं डोकं रिकामं असतं, संजय राऊतांचा विरोधकांना टोला

Sanjay Raut Live | मोकळ्या माणसाचं डोकं रिकामं असतं, संजय राऊतांचा विरोधकांना टोला

| Updated on: Jul 31, 2021 | 1:22 PM

संजय राऊत यांनी नगरमध्ये पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर हल्ला चढवला. राज्याने पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

मागील काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान या पूरस्थितीवरुन विरोधक सत्ताधारी पक्षावर टीका करत असतानाच आता राज्यातील पूरपरिस्थितीवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. विरोधी पक्ष मोकळा आहे. डोकं रिकामं असतं. आरोप करतच असतात, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे.