आता दुसऱ्या शिंदेंचा एन्काऊंटर..; संजय राऊत यांचा जिव्हारी लागणारा वार
बदलापूरमधील लैंगिक अत्याचाराच्या घटनेतील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा काल एन्काऊंटर झाला. त्यावरून विरोधकांनी सरकारला घेरलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सरकारला थेट काही सवाल केलेत. बघा काय म्हणाले संजय राऊत?
एका शिंदेचा एन्काऊंटर शिंदेंनी केला दुसऱ्या शिंदेंचा एन्काऊंटर जनता करेल, असं ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत म्हणाले. नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलं आहे. अक्षय शिंदेच्या भोवती एक रहस्यमय पडदा निर्माण झालाय. त्या पडद्यामागचे सूत्रधार अद्याप अदृश्य आहे. का त्यांना वाचवण्याचा प्रयत्न झाला? का त्या चिमुकल्यांच्या माऊलींचा गुन्हा नोंद करून घेतला नाही? असा सवाल करत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी चांगलंच फटकारलं आहे. पुढे ते असेही म्हणाले, एका शिंदेचा एन्काऊंटर शिंदेंनी केला दुसऱ्या शिंदेंचा एन्काऊंटर जनता करेल, असंही संजय राऊत म्हणाले. तर आपटे, कोतवाल यांच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हे का दाखल करण्यात आले. तरी त्यांना अद्याप अटक का करण्यात आली नाही, असे सांगत असताना राऊत म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणे या मारल्या गेलेल्या आरोपीच्या स्टेटमेंटमध्ये त्याने भयंकर खुलासे केले आहेत. ते समोर येऊ नये म्हणून त्यांनी हे मुळापासून संपवून टाकल्याचे राऊत म्हणाले.