'मविआ' बैठकीपूर्वीच मोठा दावा, संजय राऊत यांनी स्पष्ट सांगितलं... कोणत्या दोन जागा ठाकरे गट लढवणार?

‘मविआ’ बैठकीपूर्वीच मोठा दावा, संजय राऊत यांनी स्पष्ट सांगितलं… कोणत्या दोन जागा ठाकरे गट लढवणार?

| Updated on: Jan 09, 2024 | 12:46 PM

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपासंदर्भात आज मविआची दिल्लीत बैठक पार पडण्यापूर्वीच संजय राऊत यांनी जागावाटपाबाबत मोठा दावा केलाय. इतकंच नाही तर लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट कोणत्या दोन जागा लढवणार हे देखील स्पष्टपणे म्हटलंय.

नवी दिल्ली, 09 जानेवारी 2024 : महाराष्ट्रातील तीन पक्षांच्या जागावाटपासंदर्भात अंतिम मसुदा तयार व्हावा यासंदर्भात आज दिल्लीत मविआची बैठक आहे. महाराष्ट्रात यासंदर्भात बैठका झाल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपासंदर्भात आज मविआची दिल्लीत बैठक पार पडण्यापूर्वीच संजय राऊत यांनी जागावाटपाबाबत मोठा दावा केलाय. इतकंच नाही तर लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट कोणत्या दोन जागा लढवणार हे देखील स्पष्टपणे म्हटलंय. ‘महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला ज्या जागा हव्यात त्यावर शिवसेना लढणार नाही. काँग्रेसच्या बाबतीतही तसंच ज्या जागांवर काँग्रेस आहे. तिथे शिवसेनेचा दावा फार कमी आहे. आज संध्याकाळी चार वाजता बैठक होणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत महाराष्ट्रातील मविआच्या नेत्यांची बैठक होणार आहे. तर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात नाना पटोले अशोक चव्हाण हेही असतील’, असे राऊत म्हणाले. तर मुंबई आणि ठाणे या दोन्ही जागा आम्ही लढत आहोत, असे राऊत म्हणाले.

Published on: Jan 09, 2024 12:46 PM