...तर भाजप ग्रामपंचायतही जिंकणार नाही,  ईव्हीएमवरून संजय राऊत यांचे गंभीर आरोप

…तर भाजप ग्रामपंचायतही जिंकणार नाही, ईव्हीएमवरून संजय राऊत यांचे गंभीर आरोप

| Updated on: Feb 01, 2024 | 11:16 AM

चंदीगढमधील महापौरपदाच्या निवडीवरूनही त्यांनी यंत्रणांच्या गैरवापराचा आरोप केलाय. या व्हिडीओमध्ये विरोधक भाजपला घेरताना दिसताय. व्हायरल होणारा व्हिडीओ हा चंदीगढमधील महापौरपदाच्या निवडीचा आहे. व्हिडीओमध्ये दिसणारे निवडणुकीसाठीचे नियुक्त अधिकारी हे काहीतरी लिहितांना दिसताय.

मुंबई, १ फेब्रुवारी २०२४ : जर ईव्हीएम नसेल तर भाजप ग्रामपंचायतही जिंकणार नाही, असा दावा संजय राऊत यांनी केलाय. अशातच चंदीगढमधील निवडणूक वादात आली आहे. चंदीगढमधील महापौरपदाच्या निवडीवरूनही त्यांनी यंत्रणांच्या गैरवापराचा आरोप केलाय. या व्हिडीओमध्ये विरोधक भाजपला घेरताना दिसताय. व्हायरल होणारा व्हिडीओ हा चंदीगढमधील महापौरपदाच्या निवडीचा आहे. व्हिडीओमध्ये दिसणारे निवडणुकीसाठीचे नियुक्त अधिकारी हे काहीतरी लिहितांना दिसताय. मात्र आपच्या दाव्यानुसार त्यांनी विरोधकांची आठ मतं अवैध्यपणे रद्द ठरवली आहेत. चंदीगढमध्ये आप आणि काँग्रेसचं बहुमत होतं. मात्र विरोधकांची आठ मतं अवैध्य ठरल्याने भाजपचा महापौर आणि उपमहापौर जिंकलाय. त्यावरून हे आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. चंदीगड महापालिका निवडणुकीत नेमकं काय घडलं? चंदीगड महापालिका निवडणुकीच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवरून काय आरोप-प्रत्यारोप करण्यात आले? बघा स्पेशल रिपोर्ट

Published on: Feb 01, 2024 11:16 AM