ज्युनिअरच्या हाताखाली काम नाही, ‘त्यांना’ शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
शरद पवारांच्या एका मुलाखतीनंतर संजय राऊत यांनी हा मोठा गौप्यस्फोट केला आहे. इतकंच नाहीतर युतीमध्ये असताना देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन आणि सुधीर मुनगंटीवार यांचा देखील एकनाथ शिंदे यांना विरोध होता, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. बघा संजय राऊत यांनी काय केला मोठा दावा?
अजित पवार, सुनील तटकरे आणि दिलीप वळसे पाटील यांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, ज्युनिअरच्या हाताखाली काम करणार नाही, अशी त्यांची भूमिका होती, असं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत केलं असून मोठा दावा केला आहे. शरद पवारांच्या एका मुलाखतीनंतर संजय राऊत यांनी हा मोठा गौप्यस्फोट केला आहे. इतकंच नाहीतर युतीमध्ये असताना देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन आणि सुधीर मुनगंटीवार यांचा देखील एकनाथ शिंदे यांना विरोध होता, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. ‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको, आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणार नाही, असे सांगणारे सर्वात पहिले सुनील तटकरे, अजित पवार आण दिलीप वळसे पाटील होते. आम्ही सिनिअर आहोत त्या ज्युनिअर माणसाच्या हाताखाी काम नाही करणार..’, असे राऊतांनी म्हटले.
Published on: May 19, 2024 01:42 PM
Latest Videos