संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमकं काय घडलं?
ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तर यावेळी संजय राऊत यांनी बोगस मतदान झाल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांनाच जाब विचारले आहे. तर दुसरीकडे सुनील राऊत पोलिसांवर भडकल्याचे पाहायला मिळाले. नेमकं काय घडलं?
ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. उत्तर पूर्व म्हणजेच इशान्य मुंबईमधील उपनगरांमध्ये भांडूपचा देखील समावेश होतो. येथील मतदारसंघात राऊत बंधूंनी आपले मतदान केले. याच मतदारसंघात भाजपचे मिहीर कोटेचा विरूद्ध ठाकरे गटाचे संजय दिना पाटील यांच्यात लोकसभेची लढत पाहायला मिळत आहे. दरम्यान यावेळी संजय राऊत यांनी बोगस मतदान झाल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांनाच जाब विचारले आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन करण्यात येत होते. त्यामुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा प्रकारही घडल्याचे पाहायला मिळाले. याप्रकारानंतर सुनील राऊत पोलिसांवरच चांगले भडकले. इतकच नाहीतर सुनील राऊत आणि संजय राऊत यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना सोडण्याचा आग्रह केला.