Sanjay Raut: संजय राऊत यांना ईडीच्या कार्यालयात नेण्याची शक्यता!
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांच्यावर ही कारवाई करण्यात येत असून या आधीही त्यांच्यावर याच घोटाळ्या प्रकरणी कारवाई झालेली आहे. संजय राऊत यांना ईडीच्या कार्यालयात नेण्याची शक्यता आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरावर ईडीची धाड सुरु आहे. शिवसेनेकडून याचा तीव्र निषेध होत असून शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांच्यावर ही कारवाई करण्यात येत असून या आधीही त्यांच्यावर याच घोटाळ्या प्रकरणी कारवाई झालेली आहे. संजय राऊत यांना ईडीच्या कार्यालयात नेण्याची शक्यता आहे. सकाळी सात वाजता संजय राऊत यांच्या घरावर इडीची धाड पडली होती ती अद्यापही चालू आहे. यामध्ये जप्तीची कारवाई काय करण्यात आलेली आहे याबद्दल कुठलीही माहिती समोर आलेली नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनीही या कारवाईचा निषेध केलेला आहे. अनेक नेते सोशल मीडियाच्या माध्यमातून निषेध व्यक्त करताना दिसत आहे.