Sanjay Raut | राज्यपालांवर टीका केली नाही, तुमच्या हातात असेल तर आताच अटक करा; संजय राऊतांचं भाजपला आव्हान

Sanjay Raut | राज्यपालांवर टीका केली नाही, तुमच्या हातात असेल तर आताच अटक करा; संजय राऊतांचं भाजपला आव्हान

| Updated on: Sep 05, 2021 | 10:57 AM

 शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना डिवचले आहे. राज्यपालांवर मी टीका केली नाही. तुम्हाला तसं वाटत असेल त आताच अटक करा, असं आव्हानच संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना दिले आहे.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हे आव्हान दिलं आहे. मी राज्यपालांवर टीका केली नाही. राज्यपाल आमच्यासाठी नेहमीच आदरणीय आहेत आणि राहतील. तुमच्या हातात असेल तर मला आता अटक करा, असं राऊत म्हणाले. राऊतांच्या दंडात ताकद आहे का? या चंद्रकांत पाटील यांच्या प्रश्नावरही त्यांनी उत्तर दिलं आहे. शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा काढला. तुम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करा म्हणता का? इतिहास समजून घ्या. आमच्या दंडाशी बरोबरी करू नका. आमच्याकडे दंड आणि दांडा दोन्ही ही असतो, असा इशारा त्यांनी दिला.

Published on: Sep 05, 2021 10:57 AM