Sanjay Raut यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चॅलेंज, ‘तुमच्यात हिमंत असेल तर…’
VIDEO | 'अंगार कोण भंगार कोण हा येणारा काळ ठरवेल', उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दिला अप्रत्यक्षपणे इशारा, तर तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही वेगळा पक्ष स्थापन करा, असे म्हणत राऊतांनी मुख्यमंत्र्यांना चॅलेंज दिले आहे.
मुंबई, ११ ऑक्टोबर २०२३ | शिवतीर्थावर शिवसेनेची स्थापना झाली. तेव्हापासून आजपर्यंत दसरा मेळावा हा शिवसेनेचा विचारांचा अंगारच घेऊनच असतो. बाळासाहेब ठाकरे असताना त्यानंतरही होणाऱ्या दसरा मेळाव्यानं देशामध्ये महत्व प्राप्त केलं आहे. त्यामुळे अंगार कोण भंगार कोण हा येणारा काळ ठरवेल. तुमचे विचार ऐकण्यासाठी येत असतील तर येऊ द्या तुमच्या विचारांना आम्ही अंगार भंगार म्हणणार नाही, असंही संजय राऊत म्हणाले. राज्यात बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेनेला भंगार म्हणण्या इतकी आपली जीभ खाली घसरली आहे. आपण सध्या नड्डा मोदी आणि अमित शाह यांच्या मतांवर चालत आहेत. हा काय बाळासाहेबांच्या विचारांचा अंगार नाही. आज शिंदे जे पी नड्डा यांच्या स्वागतासाठी बोर्ड लावताय. ही तुमच्यावर ही वेळ आली आहे, तुम्ही कोणता विचार देणार आहात महाराष्ट्राला? असा सवाल करत म्हणत राऊत यांनी शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. तर तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही वेगळा पक्ष स्थापन करा, असे म्हणत राऊतांनी मुख्यमंत्र्यांना चॅलेंज दिले आहे.