'स्वत:च्या इज्जतीचे धिंडवडे काढायचे असतील तर...', नितेश राणे यांचा संजय राऊत यांना इशारा

‘स्वत:च्या इज्जतीचे धिंडवडे काढायचे असतील तर…’, नितेश राणे यांचा संजय राऊत यांना इशारा

| Updated on: Jun 11, 2023 | 3:51 PM

VIDEO | संजय राऊत यांनी अब्रुनुकसानीचा दावा ठोकल्यानंतर नितेश राणे यांचं प्रत्युत्तर

मुंबई : संजय राऊत यांनी थेट नितेश राणे यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. राऊत यांच्याकडून नितेश राणे यांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठविण्यात आली असून त्यावर 4 जुलैला सुनावणी होणार आहे. तर नितेश राणेंना आता यावर कोर्टातच उत्तर द्याव लागणार आहे. दरम्यान, संजय राऊत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असा दावा नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणे यांच्या या वक्तव्यावरूनच राऊत यांनी नितेश राणेंविरोधात अब्रुनुकसानीची दावा ठोकलाय. यावर नितेश राणे यांचं प्रत्युत्तर आलंय. ज्यांची अब्रुच राहिली नाही त्यांनी अब्रुनुकसानीची नोटीस मला पाठविली. नोटीस आल्यावर त्याला कायदेशीर उत्तर देऊ. स्वत:च्या इज्जतीचे धिंडवडे काढायचे असतील तर नोटीस पाठवेल असा इशारा देत नितेश राणे यांनी कोर्टात उत्तर देऊ असे सांगितले आहे.

Published on: Jun 11, 2023 03:50 PM