Special Report | एकनाथ शिंदे यांच्या 4 मंत्र्यांना डच्चू मिळणार, कोण आहेत 'ते' चार मंत्री?

Special Report | एकनाथ शिंदे यांच्या 4 मंत्र्यांना डच्चू मिळणार, कोण आहेत ‘ते’ चार मंत्री?

| Updated on: Jun 13, 2023 | 9:10 AM

VIDEO | एकनाथ शिंदे यांच्या 4 मंत्र्यांच्या गच्छंतीचा संजय राऊत यांचा नेमका दावा काय? बघा स्पेशल रिपोर्ट

मुंबई : सध्या राजकीय वर्तुळात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरूये, मात्र यापूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या ४ मंत्र्यांना डच्चू मिळणार, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. शिंदे यांच्या शिवसेनेतील चार ते पाच मंत्र्यांना मंत्रिमंडळातून हटवण्यात येणार असून भाजपच्या हायकमांडनं मुख्यमंत्र्यांना तशा प्रकारच्या सूचना दिल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. येत्या काही दिवसांतच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्याच विस्तारात नव्याने काहींना संधी मिळणार तर काहींना डच्चू देण्यात येणार आहे, असं विरोधकांना वाटतंय. तर कृषीमंत्री अब्दुल सत्तार, अन्न, औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, मंत्री संदीपान भुमरे आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचं मंत्रिपद धोक्यात असल्याचा दावा विरोधकांचा आहे. ज्या ४ मंत्र्यांचा उल्लेख विरोधकांकडून होतोय. ते चारही मंत्री कोणत्या न कोणत्या कारणानं वादाच्या भोवऱ्यात आहे. बघा याबाबतचा स्पेशल रिपोर्ट

Published on: Jun 13, 2023 09:10 AM