डेथ वॉरंटच्या ‘त्या’ दाव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी फटकारलं; म्हणाले, ‘काहीजण नशा करून…’
VIDEO | 'पुढील १५ दिवसात सरकार कोसळणार, सरकारचं डेथ वॉरंट तयार', संजय राऊत यांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीस म्हणताय...
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काल पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकार कोसळण्याबाबत भाकित केलं आहे. संजय राऊत म्हणाले, पुढच्या पंधरा ते वीस दिवसात हे सरकार कोसळेल, सरकारचं डेथ वॉरंट तयार आहे, त्यावर सही व्हायची बाकी आहे, पुष्पचक्र अर्पण करा, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजप शिंदे गट युतीतील सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. दरम्यान आज संजय राऊत यांनी केलेल्या या दाव्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर देत चांगलेच फटकारल्याचे समोर आले आहे. ते म्हणाले, ‘सध्याच्या काळात राजकारणातही कुस्त्या सुरू झाल्या आहेत. त्यातील काही जणं सकाळी सकाळी नशा करून कुस्ती खेळतात. पण नशा केलेल्या पैलवानांना कुस्तीतून बादच व्हावं लागतं. जे असली मातीचे पैलवान असतात तेच कुस्त्या जिंकतात. जनतेच्या आशीर्वादानं शिंदेच्या नेतृत्वात आम्ही कुस्ती जिंकली आहे. आणि २०२४ साली पुन्हा भाजप-शिवसेनेचं सरकार येणार’, असे म्हणत त्यांनी विश्वास व्यक्त करत राऊतांना जोरदार टोला लगावला.