'शरद पवारांच्या बाबतीत जो प्रकार घडला त्याला...', राजीनाम्यावर संजय राऊत यांचं पुन्हा भाष्य

‘शरद पवारांच्या बाबतीत जो प्रकार घडला त्याला…’, राजीनाम्यावर संजय राऊत यांचं पुन्हा भाष्य

| Updated on: May 06, 2023 | 12:35 PM

VIDEO | शरद पवार यांच्या राजीनाम्यावर संजय राऊत यांचं पुन्हा भाष्य; म्हणाले, 'राजीनामा देणं हा त्यांचा...'

मुंबई : उद्धव ठाकरे आज रत्नागिरीतील बारसूच्या दौऱ्यावर आहेत. (Uddhav Thackeray) दरम्यान, बारसूत उद्धव ठाकरे यांना येऊ देणार नाही, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला होता. नारायण राणे यांनी दिलेल्या इशाऱ्याची ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खिल्ली उडवली आहे. येऊ देणार नाही म्हणजे काय? तुमच्या या पोकळ धमक्या बंद करा, असे म्हणत राऊत यांनी थेट इशारा दिला आणि म्हणाले, उद्धव ठाकरे यांना रोखून तर दाखवाच, असं आव्हानही संजय राऊत यांनी दिलं आहे. यावेळी शरद पवार यांच्या राजीनाम्यावरही भाष्य केलं. शरद पवारांच्या बाबतीत जो प्रकार घडला त्याला शक्तीप्रदर्शन म्हणणं मला योग्य वाटत नाही. तो एक स्वतंत्र पक्ष आहे. एक फार मोठी पिढी पवारांसोबत काम करत आहे. पवारांच्या या निर्णयाने त्यांना धक्का बसणे स्वाभाविक आहे. राजीनामा देणं हा त्यांचा भावनिक निर्णय होता. त्यांनी निर्णय मागे घेतला त्याचा आनंद आहे. पवारांचं नेतृत्व असलं पाहिजे. काल मी त्यांना भेटून सांगितलं. पवारांनी राजीनामा मागे घेतला हे देशाच्या राजकारणासाठी योग्य झालं, असं त्यांनी सांगितलं.

Published on: May 06, 2023 12:35 PM