'मविआ'तील जागा वाटपाचं सूत्र अन् 'वंचित'सोबतचा माइंड गेम काय? राऊतांनी दिलं रोखठोक उत्तर

‘मविआ’तील जागा वाटपाचं सूत्र अन् ‘वंचित’सोबतचा माइंड गेम काय? राऊतांनी दिलं रोखठोक उत्तर

| Updated on: Mar 01, 2024 | 2:44 PM

लोकसभा जागा वाटपाबाबत अंतिम मसुदा तयार होतोय. अंतिम चर्चा झाली. आता बैठका होणार नाही. चौघांच्या डोक्यात कोण कुठे लढणार हे क्लिअर आहे. अमूक जागा लढणार तमूक जागा लढणार हा आकडा हा मुद्दा नाही? महाविकास आघाडीतील जागा वाटपाचं सूत्र काय राऊतांनी सांगितलं.

मुंबई, १ मार्च २०२४ : ‘मविआ’तील जागा वाटपाचं सूत्र अन् ‘वंचित’सोबतचा माइंड गेम काय? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना केला असता त्यांनी रोखठोक भूमिका मांडली. ते म्हणाले, माइंड गेम असण्याचा प्रश्नच नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना तीन वर्षापासून एकत्र आहे. सत्तेत एकत्र होतो. आता विरोधातही एकत्र आहोत. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीत सामील करून घ्या, इंडिया आघाडीत सामील करून घ्या म्हटलं. आमचीही तीच भूमिका आहे. लोकशाही संकटात आहे. त्यांच्या रक्षणासाठी जागृती करण्याचं काम बाबासाहेबांचे नातू करत आहेत. त्यांना सोबत घेतलं पाहिजे. आंबेडकर यांच्या इच्छेनुसार त्यांना आम्ही सोबत घेतलं आहे. चर्चेत ते असतात. शिवसेना आणि वंचितची युतीही आमची झालेली आहे. लोकसभा जागा वाटपाबाबत अंतिम मसुदा तयार होतोय. अंतिम चर्चा झाली. आता बैठका होणार नाही. चौघांच्या डोक्यात कोण कुठे लढणार हे क्लिअर आहे. अमूक जागा लढणार तमूक जागा लढणार हा आकडा हा मुद्दा नाही. तुम्ही किती जागा जिंकू शकता आम्ही किती जिंकू शकतो, जिंकेल त्याची जागा हे सूत्र आहे. ओरबाडून घेणार नाही. भाजपने आमच्याकडून नेहमी ओरबाडून घेतलं, असे म्हणत राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केला. बघा काय म्हणाले संजय राऊत…

Published on: Mar 01, 2024 02:44 PM