Sanjay Raut :  औरंगाबादच्या संभाजीनगर करण्याच्या पवारांच्या भूमिकेवरही संजय राऊतांचं भाष्य, काय म्हणालेत राऊत? पाहा

Sanjay Raut : औरंगाबादच्या संभाजीनगर करण्याच्या पवारांच्या भूमिकेवरही संजय राऊतांचं भाष्य, काय म्हणालेत राऊत? पाहा

| Updated on: Jul 11, 2022 | 10:58 AM

'महाराष्ट्रातील 11 कोटी जनतेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात गेली आहे. या देशात लोकशाही आहे की नाही? या देशातील कारभार राज्यघटनेनुसार चालतो की नाही? की तिथेही दाबदबाव आहे,' असंही राऊत यावेळी म्हणालेत.

मुंबई: ‘औरंगाबादच्या संभाजीनगर करण्याच्या पवारांच्या भूमिकेवरही शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवारांची एक भूमिका आहे. आमच्याशी चर्चा झाली नाही. समन्वय नव्हता एवढंच पवार म्हणाले. निर्णयाला विरोध केला नाही, असं राऊत यांनी स्पष्ट केलं. ‘महाराष्ट्रात ज्या प्रकारे एक बेकायदेशीर सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न झाला ते पाहता हे सरकार लादलं आहे. त्यासाठी विधीमंडळ आणि राजभवनाचा वापर करण्यात आला. त्याविरुद्ध शिवसेना (shivsena) महाराष्ट्रातील 11 कोटी जनतेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात गेली आहे. या देशात लोकशाही आहे की नाही? या देशातील कारभार राज्यघटनेनुसार चालतो की नाही? की तिथेही दाबदबाव आहे. याचा फैसला आज होणार आहे. संपूर्ण देश सर्वोच्च न्यायालयाकडे (supreme court) एका अपेक्षने पाहतोय. यावर शेवटी जे काही निर्णय घ्यायचा तो सर्वोच्च न्यायालय घेईल. पण कोर्ट आमच्या खिशात आहे. आमच्याच बाजूने लागेल अशी व्यक्तव्य काही लोकांकडून केली जात आहेत, असंही राऊत म्हणालेत.

 

Published on: Jul 11, 2022 10:55 AM