हनी ट्रॅपमध्ये अडकलेले सगळे लोकं RSS आणि भाजपशी संबधित?, संजय राऊत यांचा नेमका दावा काय?
VIDEO | प्रदीप कुरुलकर यांच्या चौकशीसाठी एसआयटी का नाही नेमली?; संजय राऊत यांचा रोखठोक सवाल
नाशिक : हनी ट्रॅप प्रकरणात प्रदीप कुरुलकर प्रकरणावरही ठाकरे गटाचे खासदार भाष्य केलं. देशद्रोही कोण हे रोज स्पष्ट होताना दिसत आहे. संघाचा एक प्रमुख प्रचारक पाकिस्तानाच्या हनी ट्रॅपमध्ये येतो. त्यावर भाजपचे लोक एसआयटी का नेमत नाही? नाशिकपर्यंत त्याचे धागेदोरे आहेत. हवाई दलाचे लोक त्यामध्ये अडकले आहेत. ते सर्व भाजपशी संबंधित आहेत. नेमा एसआयटी. पण त्यावरचं लक्ष विचलित करण्यासाठी त्र्यंबकेश्वर, अकोला आणि शेवगावात दंगली घडवत आहेत. महाराष्ट्र एकसंघ आहे. राहील. या टोळीबाजांना आम्ही उत्तर देऊ. हे लोक मराठी राज्याचं नुकसान करत आहेत, असा हल्लाबोल राऊतांनी केला. तसेच त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसून काही मुस्लिम जमावाने चादर चढवण्याचा प्रयत्न केल्यानं तणावाचे वातावरण राज्यात आहे. या प्रकाराची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला पण रामनवमीच्या वेळी दंगल झाली होती. ती पहिल्यांदाच महाराष्ट्रात दंगल झाली होती. त्याची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमली होती का? असे म्हणत संजय राऊत यांनी राज्य सरकारला फटकारले आहे.