sanjay raut on Kangana Ranaut : कंगनाला कानाखाली मारल्याच्या घटनेवर संजय राऊत म्हणाले, मला कंगनाविषयी....

sanjay raut on Kangana Ranaut : कंगनाला कानाखाली मारल्याच्या घटनेवर संजय राऊत म्हणाले, मला कंगनाविषयी….

| Updated on: Jun 07, 2024 | 1:26 PM

sanjay raut on Kangana Ranaut : चंदीगड विमानतळावर सीआयएसएफच्या एका महिला कॉन्स्टेबलने गुरुवारी मंडीच्या भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणावतला थप्पड मारण्यात आल्याच्या प्रकरणावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. काय म्हणाले संजय राऊत बघा व्हिडीओ

“कॉन्स्टेबलने तिच्या आईसाठी कायदा हातात घेतला. मात्र एका खासदारावर अशा पद्धतीने हाच उचलणं योग्य नाही”, असं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केले आहे. चंदीगड विमानतळावर सीआयएसएफच्या एका महिला कॉन्स्टेबलने गुरुवारी मंडीच्या भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणावतला थप्पड मारण्यात आल्याच्या प्रकरणावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. दरम्यान, कंगना राणावतला थप्पड मारल्याच्या घटनेनंतर संबंधित महिला कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आलं असून तिच्याविरुद्ध एफआयआर नोंदण्यात आला असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. पुढे राऊत असेही म्हणाले, मला कंगनाविषयी सहानुभूती आहे. कंगना आता खासदार आहेत आणि खासदारावर अशा पद्धतीने हात उचलणं योग्य नाही. मात्र या देशात शेतकऱ्यांचा आदर झालाच पाहिजे, मग ते शेतकऱ्यांचे पुत्र असोत किंवा कन्या असोत. लोकांच्या मनात अजूनही किती राग आहे, हे समजून घेतलं पाहिजे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं.

Published on: Jun 07, 2024 01:26 PM