संजय राऊत यांनी निवडणुकीत भ्रष्टाचार केला- किरीट सोमय्या

संजय राऊत यांनी निवडणुकीत भ्रष्टाचार केला- किरीट सोमय्या

| Updated on: Jun 13, 2022 | 2:45 PM

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 10 जून रोजी महाराष्ट्रात झालेल्या राज्यसभा निवडणुकीवरून शिवसेनेवर आरोप केले आहे. या निवडणुकीत सर्व आमदारांनी मतदान केले. मात्र आपल्याच उमेदवाराला निवडून आणण्यासाठी शिवसेनेतर्फे महाराष्ट्रातील आमदारांवर मोठा दबाव आणल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

राज्यसभा निवडणुकीत संजय राऊत  यांनी आमदारांना थेट बंदूक दाखवूनच धमकी दिली, असा खळबळजनक आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. या प्रकरणी दिल्लीत आज त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. राज्यसभा निवडणुकीत आमदारांवर दबाव आणण्यासाठी शिवसेना आणि संजय राऊत यांनी अनेक प्रकारे प्रयत्न केले. यात त्यांना धमकावण्यापर्यंत मजल गेल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. राज्यसभेची ही निवडणूक शिवसेनेने भ्रष्ट केल्याचा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 10 जून रोजी महाराष्ट्रात झालेल्या राज्यसभा निवडणुकीवरून शिवसेनेवर आरोप केले आहे. या निवडणुकीत सर्व आमदारांनी मतदान केले. मात्र आपल्याच उमेदवाराला निवडून आणण्यासाठी शिवसेनेतर्फे महाराष्ट्रातील आमदारांवर मोठा दबाव आणल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.