Sanjay Raut on Sheetal Mhatre : नगरसेविका शीतल म्हात्रेंचा बंड करून शिंदे गटात प्रवेश, शिवसेना नेते संजय राऊतांचा बोलण्यास नकार
नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी बंड करून शिंदे गटात प्रवेश केल्याबाबत त्यांना विचारण्यात आलं. त्यावर राऊत यांनी बोलण्यास नकार दिला आणि ते थेट पत्रकार परिषदेतून उठून गेले. यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोला लगावलाय.
मुंंबई : आज गुरुपौर्णिमेनिमित्त शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी संवाद साधला. याेवळी त्यांनी नगरसेविका शीतल म्हात्रे (sheetal mhatre) यांनी बंड करून शिंदे गटात प्रवेश केल्याबाबत त्यांना विचारण्यात आलं. त्यावर राऊत यांनी बोलण्यास नकार दिला आणि ते थेट पत्रकार परिषदेतून उठून गेले. यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री (CM) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी टोला लगावलाय. ‘बाळासाहेब हे गुरू होते, तसेच त्यांच्यात गुरुर होता. त्यांच्यात ब्रह्मा, विष्णू, महेश होते. ते आमचे तेजस्वी नेते होते. त्यांनी आम्हाला सावरलं. देश आणि महाराष्ट्र त्यांना गुरुस्थानी मानतो. एकनिष्ठेने शिवसैनिक बाळासाहेबांसोबत आहेत. एकनिष्ठा हीच गुरुदक्षिणा असते. आम्ही या उपकाराखाली नेहमी राहू, असं संजय राऊत म्हणालेत. हे वार लटवार पाहता आणखी वातावरण तापण्याची शक्यताय
Published on: Jul 13, 2022 11:20 AM
Latest Videos