“युती तोडल्याचा फोन उद्धव ठाकरे यांना…”; पंतप्रधान मोदी यांच्या ‘त्या’ विधानावर संजय राऊत यांचा पलटवार
उद्धव ठाकरे यांनीच शिवसेना-भाजप युती तोडली, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. यावर संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पलटवार केला आहे.
नवी दिल्ली, 09 ऑगस्ट 2023 | उद्धव ठाकरे यांनीच शिवसेना-भाजप युती तोडली, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. यावर संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पलटवार केला आहे. ते म्हणाले की, “शिवसेनेने युती तोडली असं पंतप्रधान मोदी म्हणत असतील तर ते दिशाभूल करत आहेत. 2014ची परिस्थिती पंतप्रधानांना आठवायला हवी. 2014मध्ये युती कोणी आणि का तोडली हे संपूर्ण देशानं पाहिलं. त्यानंतर शिवसेना स्वतंत्रपणे लढली. आपली युती तुटली, आपण वेगळे झाले आहोत, असं भाजपतर्फे अधिकृतपणे एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून सांगितलं. त्यामुळे शिवसेनेची साथ कोणी सोडली या संदर्भात जुना रेकॉर्ड पंतप्रधानांनी तपासून पाहावा. महाराष्ट्र सदनात फुले, शाहू, शिवाजी महाराज, आंबेडकर यांचे पुतळे आहेत. त्यांच्या साक्षीने तरी इतिहास आणि सत्य मोडून तोडून टाकू नये.”