Saamana | ‘अजित पवार भाजपसोबत जाताच… अन् सहकार महर्षींचे आख्यान’; संजय राऊत यांचा निशाणा काय?
मुंबई, २५ सप्टेंबर २०२३ | उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रातील अग्रलेखातून अजित पवार यांच्या भाजपसोबत सत्तेत जाण्याच्या भूमिकेवर आणि भाजपवरही निशाणा साधण्यात आला आहे. सहकार महर्षींचे आख्यान! या शीर्षकाखाली आजच्या सामनातून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला आहे. ‘गृहमंत्री अमित शहा व […]
मुंबई, २५ सप्टेंबर २०२३ | उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रातील अग्रलेखातून अजित पवार यांच्या भाजपसोबत सत्तेत जाण्याच्या भूमिकेवर आणि भाजपवरही निशाणा साधण्यात आला आहे. सहकार महर्षींचे आख्यान! या शीर्षकाखाली आजच्या सामनातून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला आहे. ‘गृहमंत्री अमित शहा व पंतप्रधान मोदी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मात्र दोघांचेही वैशिष्ट्य असे की, त्यांच्या कथनी आणि करणी यात अंतर असते. ते बोलतात तसे करीत नाहीत. गृहमंत्री शहा शनिवारी मुंबईत गणेश दर्शनासाठी आले. त्यांनी दर्शन घेतले व नंतर ‘सहकार’ या विषयावर एक व्याख्यान झोडले.’, असे शाह यांच्याबद्दल म्हटले आहे. तर अजित पवार यांनी भाजसोबत जाण्याचा निर्णय घेतला. ते युती सरकारमध्ये सामील झाले. पवार यांच्या भाजपसोबत जाण्याच्या भूमिकेवर आणि भाजपवर देखील टीका करण्यात आली आहे.