मुख्यमंत्री शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावर संजय राऊत यांचा निशाणा

मुख्यमंत्री शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावर संजय राऊत यांचा निशाणा

| Updated on: Jan 17, 2023 | 1:11 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत हे दावोस दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावरून पुन्हा एकदा संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत हे दावोस दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावरून पुन्हा एकदा संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. १ लाख ३६ हजार कोटी रूपयांचे उद्योग जर महाराष्ट्रात येत असतील तर त्याचे स्वागत केले पाहिजे, पण त्याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे अडीच लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात होणार होती, ती आपल्या डोळ्यासमोरून निघून गेली, असे असतानाही मुख्यमंत्र्यांकडून कोणतेही प्रयत्न केले गेले नाही. ना उद्योग मंत्र्यांनी कोणते प्रयत्न केले, अशी टीका संजय राऊत यांनी केली. फक्त तीन दिवसांत १ लाख ३६ हजार कोटींचे उद्योग महाराष्ट्रात येत असतील तर स्वागत केले पाहिजे. जर खरोखर हे प्रकल्प येत असतील तर स्वागत करायला हरकत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

Published on: Jan 17, 2023 01:07 PM