Sanjay Raut : अग्निपथ योजनेवरुन संजय राऊतांची केंद्रावर टीका, ही आग वाढतच जाणार, संजय राऊतांचा इशारा
4 वर्षांच्या कंत्राटावर ही सैन्यभरती होणार असून यावर आता जोरदार टीका होतेय.
मुंबईः देशातील विविध राज्यातून अग्निपथ या सैन्यभरती योजनेवरुन केंद्र सरकारवर टीका होते.. देशातील वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केलं जातंय. या सैन्यभरती योजनेवर पत्रकारांना प्रतिक्रिया देताना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला सुनावलंय. अग्निपथ (Agnipath) योजनेतून ठेकेदारीवर भरती केल्यास संपूर्ण सैन्यदलाची प्रतिष्ठा रसातळाला जाईल, असं म्हणत ही आग वाढतच जाणार असल्याचं देखील संजय राऊत यावेळी म्हणाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जाहीर केलेल्या अग्निपथ या सैन्यभरती योजनेवर देशभरातील विविध भागात टीका होताना दिसत आहे. 4 वर्षांच्या कंत्राटावर ही सैन्यभरती होणार असून त्यानंतर नोकरीची हमी नाही किंवा पेन्शनची सुविधा नाही. रँक नाही, यामुळे योजनेत भरती झालेल्या तरुणांचं नुकसान होणार अलल्याचं काँग्रेसनं म्हटलंय. तर शिवसेनेनं देखील जोरदार हल्लाबोल केलाय.