नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका

नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका

| Updated on: Apr 23, 2024 | 5:09 PM

आमच्या नेत्यांवर टीका चालणार नाही, असे म्हणत नारायण राणेंनी एकेरी उल्लेख करत टीका केली. अडीच वर्ष मुख्यमंत्री पदावर असताना फक्त दोन वेळा मंत्रालयात गेला, कोकणाला काय दिलं? असा सवाल करत नारायण राणेंनी ठाकरेंवर सडकून टीका केली. नारायण राणेंच्या टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर

सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणाऱ्या उद्धव ठाकरे यांना भाजप नेते आणि लोकसभा निवडणूक लढवणारे भाजप उमेदवार नारायण राणे यांनी दौऱ्याला येण्यापूर्वीच मोठं आव्हान दिलं आहे. येणाऱ्या सिंधुदुर्ग दौऱ्यात असे शब्द बोलून दाखव, मग परत जायचा रस्ता कुठून जातो ते मी तुला दाखवतो. आमच्या नेत्यांवर टीका चालणार नाही, असे म्हणत नारायण राणेंनी एकेरी उल्लेख करत टीका केली. अडीच वर्ष मुख्यमंत्री पदावर असताना फक्त दोन वेळा मंत्रालयात गेला, कोकणाला काय दिलं? असा सवाल करत नारायण राणेंनी ठाकरेंवर सडकून टीका केली. नारायण राणेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले. ‘नारायण राणे यांचं आता वय झालंय, नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत.’, असे म्हणत संजय राऊत यांनी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेवर पलटवार केलाय.

Published on: Apr 23, 2024 05:06 PM