मूर्खांना उत्तर देत नाही... देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना 'त्या' टीकेवरून सुनावले

मूर्खांना उत्तर देत नाही… देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना ‘त्या’ टीकेवरून सुनावले

| Updated on: Jan 16, 2024 | 2:42 PM

अयोध्येतील राम मंदिर मुख्य स्थळापासून ३ ते ४ किलोमीटर दूर बांधलं. तर ज्या ठिकाणी अयोध्येत राम मंदिर बनवण्याचं ठरलं होतं. त्या ठिकाणी ते मंदिर बनलं नसल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मुंबई, १६ जानेवारी २०२४ : ठाकरे गट कोट्यावधी हिंदूंचा अपमान करत आहे, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राम मंदिरावरून आरोप करून स्वतःचंच हसू करून घेत आहे, असंही म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या टीकेवर भाष्य केले आहे. अयोध्येतील राम मंदिर मुख्य स्थळापासून ३ ते ४ किलोमीटर दूर बांधलं. तर ज्या ठिकाणी अयोध्येत राम मंदिर बनवण्याचं ठरलं होतं. त्या ठिकाणी ते मंदिर बनलं नसल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘ज्यांचा राम मंदिर उभारण्यासाठी झालेल्या आंदोलनात कोणताही सहभाग नाही. अशे लोकं अशा प्रकारचे आरोप करून स्वतःचंच हसू करून घेत आहे. इतकंच नाहीतर कोट्यावधी हिंदूंचा अपमान करत आहे. आता तरी उबाठाने अशाप्रकारे आरोप करणं बंद करावं.’ असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. तर मुर्खांना उत्तर देत नसल्याचा पलटवार ही फडणवीस यांनी राऊतांवर केला.

Published on: Jan 16, 2024 02:42 PM