सावरकरांना भारतरत्न द्या म्हटलं की, तोंडाला फेस येतो; संजय राऊत यांचा थेट कुणावर हल्लाबोल?

सावरकरांना भारतरत्न द्या म्हटलं की, तोंडाला फेस येतो; संजय राऊत यांचा थेट कुणावर हल्लाबोल?

| Updated on: Feb 26, 2023 | 2:40 PM

VIDEO | पण सावरकर यांना भारतरत्न द्या अशी मागणी केली तर..., संजय राऊत यांची सडकून टीका

मुंबई : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर पुन्हा हल्लाबोल केला. दरम्यान, आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी आहे. यापार्श्वभूमीवर संजय राऊत यांना वीर सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मुद्द्यावर प्रश्न विचारण्यात आला. यावेळी संजय राऊत यांनी पुन्हा एकदा वीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी करत सावरकारांबाबत वाद असण्याचं कारण नाही. महाराष्ट्रात आणि केंद्रात सावरकरांच्या विचाराचं सरकार आहे. तसं सांगितलं जातं. पण सावरकर यांना भारतरत्न द्या अशी मागणी केली तर भाजपच्या तोंडाला फेस येतो, अशी टीका राऊत यांनी केली. वीर सावरकरांकडून बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाची प्रेरणा घेतली. पण काही लोकांना सावरकर फक्त मतांसाठी आणि राजकारणासाठी हवे आहेत. सावरकरांचा अपमान काही लोक करत असतात. त्याला उत्तर द्यायचं असेल तर हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या सरकारने त्यांना भारतरत्न द्यावा. सावरकरांना भारतरत्न देऊन हिंदुत्ववादी असल्याचं सिद्ध करावं, असे म्हणत भाजपला थेट आव्हानच राऊतांनी दिले आहे.

Published on: Feb 26, 2023 02:40 PM