दिल्लीत गुजरातचे २ दाढीवाले तर राज्यात १ दाढीवाला, संजय राऊत यांचा नाव न घेता कुणावर निशाणा?
VIDEO | संजय राऊत यांची पंतप्रधान मोदी यांच्यासह अमितशाह आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर सडकून टीका
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सातत्याने त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. थुंकण्याचा वाद राजकीय वर्तुळात सुरू असताना आा संजय राऊत यांनी नवं वक्तव्य केले आहे. दिल्लीत गुजरातचे दोन दाढीवाले तर राज्यात एक दाढीवाला असे म्हणत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. दाढी असली म्हणजे अक्कल नाही असे म्हणत त्यांनी या बड्या नेत्यांवर सडकून टीका केली आहे. तर शिंदे-भाजप सरकार तीन महिन्यांनंतर राहणार नाही, असा इशाराही संजय राऊतांनी राज्यातील सरकारला दिला आहे. तर शेतकऱ्यांच्या विरोधात तीन काळे कायदे आणले, यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आणि सरकारला ते कायदे मागे घ्यावे लागले. तर सध्याचे सरकार हे बेकायदेशीर आणि अनधिकृत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.