Saamana : भाजप ब्लॅकमेलर? महाराष्ट्रातील धाडीवर धाडी हे…, ‘सामना’तून ईडीच्या नोटीवरून सडकून टीकास्त्र
सामनातून भाजपचा ब्लॅकमेलर असा उल्लेख करत महाराष्ट्रातील धाडींवर धाडी हे ब्लॅकमेलिंगचेच सूत्र असल्याचा घणाघात सामनातून करण्यात आला आहे. दोन मुख्यमंत्र्यांच्या अटकेचा डाव आणि महाराष्ट्रातील धाडीवर धाडी हे 'ब्लॅकमेलिंग'चेच सूत्र आहे. इंडिया आघाडी मजबुतीने पुढे जात असल्याचे हे चिन्ह आहे.
मुंबई, २० जानेवारी २०२४ : बारामती अॅग्रो कंपनी प्रकरणी रोहित पवार तर कोरोना काळातील कथित बॉडी बँग घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून किशोरी पेडणेकर यांना ईडीने काल समन्स बजावले. यावरून सामनातून जोरदार टीका करण्यात आली आहे. सामनातून भाजपचा ब्लॅकमेलर असा उल्लेख करत महाराष्ट्रातील धाडींवर धाडी हे ब्लॅकमेलिंगचेच सूत्र असल्याचा घणाघात सामनातून करण्यात आला आहे. दोन मुख्यमंत्र्यांच्या अटकेचा डाव आणि महाराष्ट्रातील धाडीवर धाडी हे ‘ब्लॅकमेलिंग’चेच सूत्र आहे. इंडिया आघाडी मजबुतीने पुढे जात असल्याचे हे चिन्ह आहे. केजरीवाल – सोरेन यांनी भाजपधार्जिणी भूमिका घेतली तर मोदीभक्त या दोघांची आरती गाऊ लागतील, असे म्हणत सामनातून खोचक टीका करण्यात आली आहे. तर राजन साळवी, रवींद्र वायकर हे रात्री ‘हुडी’ वेषात देवेंद्र फडणवीसांना भेटायला गेले तर लगेच त्यांच्या शुद्धीकरणाचे होमहवन सुरू होतील. जनतेला हे कळत नाही, असे यांना वाटते काय? असा सवालच सामनातून करण्यात आला आहे.