चोर आणि लफंग्यांच्या हातात शिवसेना… ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेतून संजय राऊत यांचा हल्लाबोल काय?
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावरील निकालानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या महापत्रकार परिषदेचं आयोजन. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या निकालावर बोलताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरही हल्ला चढवला
मुंबई, १६ जानेवारी २०२४ : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावरील निकालानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या महापत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर भाष्य करण्यासाठी आज ही पत्रकार परिषदे सुरू आहे. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या निकालावर बोलताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरही हल्ला चढवला. संजय राऊत म्हणाले, शिवसेनेच्या बाबतीत जो निकाल राहुल नार्वेकर यांनी दिला. त्यानंतर लवाद म्हणजेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या महाराष्ट्रात जागोजागी अंतयात्रा निघाल्या. या राज्यात असं कधीच घडलं नव्हतं. याच कारण म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ज्या पद्धतीने ज्या लवादाने कोणताही विचार न करता राहुल नार्वेकर यांनी चोर आणि लफंग्यांच्या हातात शिवसेना दिली, आणि शिवसेना तुमची असं जाहीर केलं, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र आज खदखत आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.